हॉट फोटोशूट अंगाशी, नुसरत जहां ट्रोल

हॉट फोटोशूट अंगाशी, नुसरत जहां ट्रोल

नुसरत तिच्या हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस फोटोशूटसाठी चर्चेत आली आहे (Nusrat Jahan getting trolled for her bold photoshoot).

चेतन पाटील

|

Jan 15, 2021 | 7:19 PM

कोलकाता : तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां विविध कारणांसाठी चर्चेत असते. चर्चा आणि नुसरत जहां याचं एक जणू काही वेगळं समीकरणच आहे. कधी ती डोक्यावर सिंदूर लावल्याने तर कधी दुर्गा पूजेवरुन चर्चेत येते. मात्र, यामुळे ती बऱ्याचदा ट्रोलदेखील होते. आतादेखील नुसरत तिच्या हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस फोटोशूटसाठी चर्चेत आली आहे. मात्र, सोशल मीडियावरील लोकांच्या टीकेमुळे हा फोटोशूट नुसरतच्या अंगाशी आला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही (Nusrat Jahan getting trolled for her bold photoshoot).

नुसरतने नुकतंच येल्लो शॉर्ट वन पीस ड्रेसवर फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये नुसरत खूप सुंदर दिसत आहे. नुसरतने या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “मी त्या गोष्टीवर काम करत आहे ज्या कुणी माझ्याकडून हिसकावू शकत नाही”, असं कॅप्शन नुसरतने फोटोंना दिलं आहे. तिच्या या कॅप्शनचं आणि फोटोंचं काही लोक कौतुक करत आहेत. तर काही जण सडकून टीका देखील करत आहेत.

काही लोकांनी नूसरतला खासदार पदाची प्रतिष्ठा राखण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी नुसरतला छोटे कपडे परिधान न करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही लोकांनी या फोटोत सुंदर दिसत असल्याची कमेंट केली आहे (Nusrat Jahan getting trolled for her bold photoshoot).

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

नुसरत जहां ऑक्टोबर 2019 मध्ये दुर्गा पुजा केल्याने देवबंदी उलेमा यांनी नाराजी व्यक्त केली होती. नवरात्री दरम्यान नुसरतने पती निखिल जैनसोबत कोलकाता येथे दुर्गा पुजा केली होती. याबाबतचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, दुर्गा पुजा केल्याने देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी नुसरतने नाव बदलून घ्यावं, असा खोचक सल्ला दिला होता.

हेही वाचा : मुंबई सज्ज, पहिल्या दिवशी साडेबारा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें