Viral: येमेनच्या झाडाची खास गोष्ट,”…कापल्यावर त्यातून रक्त बाहेर पडतं अशी इथल्या लोकांची मान्यता आहे”

जर झाडांनाही इतर सजीवांप्रमाणे वेदना होत असतील तर? त्यांनाही भावना असतील तर? समजा आपण एखादं झाड तोडलं आणि त्या झाडाला जखम झाली किंवा "मला तोडलं" असं म्हणत झाडंच रडू लागलं तर? बापरे! विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.

Viral: येमेनच्या झाडाची खास गोष्ट,...कापल्यावर त्यातून रक्त बाहेर पडतं अशी इथल्या लोकांची मान्यता आहे
येमेनच्या झाडाची खास गोष्ट
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 1:15 PM

झाडं (Plants) का तोडू नयेत हे वेगळं सांगायची गरज नाही! आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं कि झाडं ही सजीव असतात. आठवतंय आपण जेव्हा सजीव आणि निर्जीव वस्तूंचं वर्गीकरण (Classification Of Living Thing) करायचो तेव्हा झाडांना आपण कधीच निर्जीव म्हणत नव्हतो, आपण त्यांना सजीवच्या गटात टाकायचो. पण आज बरोबर हीच गोष्ट आपण विसरत चाललोय. जर झाडांनाही इतर सजीवांप्रमाणे वेदना (Hurt) होत असतील तर? त्यांनाही भावना असतील तर? समजा आपण एखादं झाड तोडलं आणि त्या झाडाला जखम झाली किंवा “मला तोडलं” असं म्हणत झाडंच रडू लागलं तर? बापरे! विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.

मानवी रक्तासारखं द्रव यातून बाहेर पडायला लागतं

असंच एक झाड आहे. जे तोडलं, किंवा त्याला जरा जरी जखम झाली तरी त्रास होतो. येमेन नावाची एक जागा आहे जिथे हे झाड आढळतं. ड्रॅगन ब्लड ट्री असं या झाडाचं नाव आहे. या झाडाला तोडायला गेलं की मानवी रक्तासारखं द्रव यातून बाहेर पडायला लागतं, जणू काही झाडाला जखमंच झालीये असं वाटू लागतं. आजच्या काळात भविष्यासाठी झाडं तोडणं किती धोकादायक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण क्वचित आपण कधी असं एखादं झाड पाहिलं असेल जे कापल्यावर रक्ताचे अश्रू बाहेर त्या झाडातून येत असतील.

येमेनच्या झाडाची खास गोष्ट

येमेनमध्ये हा वृक्ष आढळतो. साधारणतः पारदर्शक किंवा पांढरं द्रव्य झाडांमधून बाहेर पडत असतं पण हे झाड तोडल्यास मानवी रक्ताप्रमाणेच लाल द्रव त्यातून बाहेर पडतो. बघता बघता सारे लोक म्हणत आहेत की, जणू काही झाड रक्ताचे अश्रू रडत आहे.

हे सुद्धा वाचा

ड्रॅगन ब्लड ट्री

या विशिष्ट झाडाचे नाव ड्रॅगन ब्लड ट्री असे आहे. उष्ण तापमानातही वाढ करण्याची क्षमता त्यात आहे. तुम्हालाआश्चर्य वाटेल की याचे वय 650 वर्षांपर्यंत असू शकते. त्याचा आकार छत्रीच्या आकारासारखाच असतो. त्याच्या रक्तवृक्षाच्या नावामागेही एक रहस्य आहे. रहस्य म्हणजे त्याची साल कापल्यानंतर त्यातून लाल रंगाची रक्तासारखी द्रव्य बाहेर पडतं.

वेगवेगळ्या समजुती

अनेक झाडांबद्दल लोकांच्या ज्याप्रकारे वेगवेगळ्या समजुती असतात, त्याचप्रमाणे या झाडाबद्दल लोकांच्याही काही समजुती आहेत. त्यातून निघणारे लाल रेझीन बऱ्यापैकी फायदेशीर मानले जातात. ताप आणि अल्सरसह अनेक रोगांवर हे औषध मानले जाते. या कारणास्तव ते जादूई देखील मानले जाते. त्याचा लाल रंग भिंती रंगवण्यातही उपयुक्त ठरतो.

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.