मानवतेला काळिमा! रात्रीच्या अंधारात भटकत्या हत्तीवर फेकले जळालेले टायर, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:58 PM, 22 Jan 2021
मानवतेला काळिमा! रात्रीच्या अंधारात भटकत्या हत्तीवर फेकले जळालेले टायर, व्हिडीओ व्हायरल

नीलगिरीः गेल्या काही दिवसांपूर्वी एका गर्भवती हत्तिणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाण्यास दिल्यानं त्याचा स्फोट होऊन ती हत्तीण रक्तबंबाळ झाली होती. नदीपात्रात तिने उभं राहून आपला जीव सोडला. त्यावेळी देशभरातून त्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला होता, तसेच या घटनेनं सगळेच हळहळले होते. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार समोर आलाय. सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यात स्तरातून संतापाची लाट उसळलीय. (Viral Video Of Burning Tyre Thrown On Elephant People Demand Justice)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हत्ती अन्नाच्या शोधात निवासी भागात जाताना दिसतोय. पण रात्रीच्या अंधारात एका निर्दयी माणसाने त्या हत्तीवर जळणारा टायर फेकला. आपला जीव वाचवण्यासाठी अग्नीच्या ज्वाळांनी वेढलेला हत्ती बचावासाठी धावला आणि तो जळालेला टायर डोक्यावर घेऊनच जंगलाच्या दिशेने निघून गेला. या प्रकारानंतर सर्वच स्तरांतून घटनेचा निषेध नोंदवला जातोय. तामिळनाडूतील नीलगिरी परिसरातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय.

जळालेल्या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या जळालेल्या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून माणुसकीच्या नात्याला काळिमा फासल्याच्या भावना लोक व्यक्त करू लागली आहेत. बऱ्याच लोकांनी त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली. अशा प्रकारे हत्तीला दुखापत करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या व्हायरल व्हिडीओवरून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी अशी कृत्ये करणाऱ्या व्यक्तींना चांगलेच धारेवर धरलेय.

हत्तीला वस्तीपासून दूर लोटण्यासाठीचा हा प्रकार अत्यंत भयानक
एक युजर्स लिहितो, हे अगदी भयानक आहे, एका खासगी रिसॉर्ट चालवणा-या लोकांनी # नीलगिरीमधील 50 वर्षीय वर्षीय हत्तीवर पेटलेला टायर फेकला. तर दुसरा एक युजर्स लिहितो, हत्तीला वस्तीपासून दूर लोटण्यासाठीचा हा प्रकार अत्यंत भयानक आणि क्रूर आहे. त्या प्राण्याचा कदाचित मृत्यूही झाला असेल. मी तामिळनाडूमधील वन अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे.

संबंधित बातम्या

रणथंबोरच्या अभायारण्यात दोन वाघांमध्ये झाली जीवघेणी लढाई; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गडचिरोलीत हत्ती गाळात रुतला, तडफडून थकला, 20 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू

Viral Video Of Burning Tyre Thrown On Elephant People Demand Justice