
आजच्या काळात आपल्यापैकी बरेज जण ऑनलाईन गोष्टी मागवतात, त्यामुळे घरी अनेक पार्सल्स येत असतात. कधी शॉपिंगचं, कधी गिफ्ट म्हणून काही येतं. पण एखाद्या दवशी घराची बेल वाजली आणि तुमच्या हातात रक्ताने लडबडलेलं पार्सल आलं तर ? तुमची काय हालत होईल ? हदय वेगाने धडधडू लागेल, भीतीने थरकाप उडेल आणि डोक्यात हजारो प्रश्नांचं मोहोळ उठले. हे रक्त कोणाचं, असं भयानक पार्सल कोणी दिलं ?कोणी मजा तर करत नाहीये ? असे सगळे प्रश्न तुम्हाला पडतील ना.
असंच काहीसं घडलं ते इंग्लंडच्या स्टॅनली येथे राहणाऱ्या 27 वर्षांच्या एरॉनसोबत. बेल वाजली आणि त्याच्या घरी एक पार्सल आलं, पण ते रक्ताने लडबडलेलं होतं. ज्या कलेक्टर बॅजची तो उत्सुकतेने वाट पहात होता, तेच पार्सल आता त्यातासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे ठरलं आहे.
पार्सल उघडताच बसला धक्का
द मिररने याबद्दल वृत्त दिलं आहे. जेव्हा पोस्टमनने पार्सल पोहोचवले तेव्हा मी सुरुवातीला गोंधळला होतो, असं एरॉन म्हणाला. कारण एक पांढरा लिफाफा दोन पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये गुंडाळलेला होता, ज्यावर ““माफी नोटिस” (Apology Notice) देखील जोडलेली होती. पण त्याने ते पार्सल उघडताच तो हादरला.
“जेव्हा मी ते पार्सल आलेला लिफाफा उघडला, तेव्हा तो रक्ताने माखला होता. अगदी पारदर्शक पिशवीतही रक्त होतं, जे बाहेर पडून माझ्या हातावर सांडलं” असं एरॉनने सांगितलं. सुरुवातीला मला वाटलं की कोणीतरी चुकून मांस पाठवलं आहे आणि पॅकेजिंग फाटलं आहे. पण जेव्हा त्याने रॉयल मेलच्या ग्राहक सेवेशी संप्रक साधला, तेव्हा त्याला सांगण्यात आले की, “हे मांस असू शकत नाही, कारण पोस्टामध्ये मांस ठेवण्याची परवानगी नाही. ते कदाचित मानवी रक्त असावे.” असा अंदाज त्यांनी वर्तवला.
संसर्गाची भीती आणि चिंता
माजी पॅरामेडिक एरॉन या पार्सलमुळे खूप चिंतेत आहे, कारण त्याला भीती आहे की रक्तात हेपेटायटीस किंवा एचआयव्ही (HIV) सारखे संसर्ग असू शकतात. “मला त्याची विल्हेवाट कशी लावायची हे माहित नव्हतं. ते वैद्यकीय कचऱ्यासारखे (Medical Waste) आहे. रॉयल मेलने ते परत घेण्याची ऑफर दिली, परंतु नियमांनुसार तसं करण्याची परवानगी नाही,” असं त्याने सांगितलं. एरॉन म्हणाला की इतक्या रक्तामुळ केवळ त्याचं पार्सलच नव्हे तर इतर पार्सलही दूषित झाली असतील. “ज्याने ते पॅक केले त्याला माहित होते की त्यात रक्त आहे, म्हणूनच त्यांनी ते डबल बॅगमध्ये ठेवले. ज्याने हे केले त्याने खूप चुकीचे आणि घृणास्पद कृत्य केले आहे.” असंही त्याने नमूद केलं.
एरॉनने ही घटना सोशल मीडियावर शेअर करताच, लोकांनी त्यावर बऱ्याच कमेंट्स केल्या. हे अतिशय “धक्कादायक” आणि “असुरक्षित” असल्याचं अनेक यूजर्सनी म्हटलं तर याबद्दल पोलिसांना कळवावं असंही काही लोकांनी त्याला सुचवलं.