मुंबईकर ऑनलाईन कोणते पदार्थ सर्वाधिक मागवतात?; तुमचा विश्वासही बसणार नाही…
आधी आपल्याकडील रेस्टॉरंट त्यांच्या आसन क्षमतेनुसार जेवण पुरवित होत्या. झोमॅटो आणि स्विगी कंपन्या आल्यानंतर या रेस्टॉरंट्सना आता आपल्याकडील कस्टमरना जेवण पुरविण्यासोबतच ऑनलाईन फूड डिलिव्हरी एप झोमॅटो आणि स्विगीसारख्या कंपन्यांचा देखील मेन्यू झटपट तयार करावा लागत आहे.
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे ऑनलाईन फू़ड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांची खूप चलती आहे. बाहेरुन आपल्या आवडत्या ब्रँडचे जेवण जर अवघ्या काही मिनिटांत घरपोच मिळत असेल तर कोणाला नको आहे. कुटुंबातील कोणतेही क्षण साजरे करायचे असतील किंवा बॅचलर्सना बर्थडे पार्टी द्यायची असेल किंवा कोणतेही निमित्त असो आता ऑनलाईन फूड मागविणे मोबाईलमुळे खूपच सोपे झाले आहे. झोमॅटो आणि स्विगी सारख्या कंपन्या भारतात त्यामुळे खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आता खवय्यांचे सर्वे करु लागल्या आहेत. डिलिव्हरी कंपन्यांचा सर्वे लोकांच्या खाण्याचा सवयींचा लेखाजोखा मांडीत आहेत.
अलिकडे देशाची जायंट ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने साल 2023-24 मध्ये रात्री उशीराच्या ऑर्डर्स दिल्ली एनसीआरच्या लोकांना पुरविल्याचे उघडकीस आले आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी बंगळुरु येथील लोकांना सर्वाधिक या प्लॅटफॉर्मचा वापर केला.फूड मागविण्याचे वेगवेगळे ट्रेड आता या कंपनीची कमाई जबरदस्त वाढवित आहेत.
83 कोटींची तगडी कमाई
गेल्यावर्षी ऑगस्ट पासून प्लॅटफॉर्म शुल्काची सुरुवात करणाऱ्या झोमॅटो कंपनीने संपलेल्या आर्थिक वर्षात 83 कोटींची तगडी कमाई केली आहे. सुरुवातीला केवळ प्रति ऑर्डर दोन रुपये फि आकारणाऱ्या या कंपनीने नंतर प्रमुख बाजारपेठात तीन टक्के वाढ करीत सहा रुपये फि आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील मार्च 2024-25 पर्यंत कंपनी घसघशीत कमाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दहा ऑर्डर पैकी सहा डिश शाकाहारी
झोमॅटोच्या आधी गेल्या आठवड्यात तिची स्पर्धक कंपनी स्विगीने देखील युजरच्या खानपान सवयींबाबत आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार देशातील दर दहा ऑर्डर पैकी सहा डिश शाकाहारी असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच ऑनलाईन डिश ऑर्डर करणारे शाकाहारी जास्त आहेत. यात मसाला डोसा, पनीर बटर मसाला, मार्गरिटा पिझ्झा आणि पाव भाजीचा समावेश आहे. या यादीत सर्वाधिक शाकाहारी पदार्थांची ऑर्डर देणाऱ्या शहरात बंगळुरु शहराचा पहिला क्रमांक आला आहे. देशातील तीन शाकाहारी ऑर्डर पैकी एक शाकाहारी ऑर्डर या बंगळुरु शहरातून केली जाते. बंगळुरु येथील लोकांना मसाला डोसा, पनीर बिर्यानी आणि पनीर बटर मसाला खूप आवडतो असे स्वीगीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
मसाला डोसा देशाची फेव्हरेट डिश
देशातील टॉप – 3 शाकाहारी डिश ऑनलाईन मागविणाऱ्या शहरात बंगळुरु नंतर मुंबईचा क्रमांक लागतो. येथील लोक दाल खिचडी, मार्गरिटा पिझ्झा आणि पाव भाजी जास्त मागवितात अशी आकडेवारी सांगते. हैदराबाद येथील लोक शाकाहारी डिशेसमध्ये मसाला डोसा आणि इडली जास्त पसंत करतात. तर ब्रेकफास्टमध्ये भारतातील 90 टक्क्यांहून अधिक ऑर्डर शाकाहारी असतात. ज्यात मसाला डोसा, वडा, इडली आणि पोंगल या डिश टॉपवर आहेत. मसाला डोसा ही डिश ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर अशा तिन्ही काळी मागितली जाणारी सर्वांची फेव्हरेट डिश आहे.