अवघे 3 तास काम करून कमावले साडेचार लाख, स्क्रीनशॉट व्हायरल होताच…

सोशल मीडियावर विविध पोस्ट येत असतात. 8-9 तासांची नोकरी करून तुम्हीही कंटाळला असाल तर या तरूणीची पोस्ट वाचून तुम्ही नक्की चक्रावाल. एका सोशल मीडिया साईटवर एका महिलेने दावा केलाय की तिने फक्त 3 तास काम करून 4 लाखांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

अवघे 3 तास काम करून कमावले साडेचार लाख, स्क्रीनशॉट  व्हायरल होताच...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 11:27 AM

सोशल मीडियावर विविध पोस्ट येत असतात. 8-9 तासांची नोकरी करून तुम्हीही कंटाळला असाल तर या तरूणीची पोस्ट वाचून तुम्ही नक्की चक्रावाल. एका सोशल मीडिया साईटवर एका महिलेने दावा केलाय की तिने फक्त 3 तास काम करून 4 लाखांपेक्षा अधिक कमाई केली आहे. श्वेता कुकरेजा नावाच्या या एका यूजरच्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामध्ये तिने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या अकाऊंटमध्ये 4,40,000 क्रेडिट झालेले दिसतात. केवळ 3 तास काम करून मला 4 लाख रुपये (5,200 डॉलर्स) मिळाले आहेत. मला फक्त त्यांच्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीवर काम करायचं होतं.

कुकरेजा हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले – ” या महिन्यात मला एका क्लायंटकडून फक्त 3 तासांच्या कामासाठी 4,40,000 रुपये मिळाले. असे दिवस खरोखरच कामाचं अधिक समाधान देतात आणि मेहनतीची खरी किंमत दिसून येते. माझी फी माझ्या कौशल्यावर आधारित आहे, मी काम केलेल्या तीन तासांबद्दल नाही. बऱ्याच वर्षांच्या अनुभवानंतर, क्लायंट माझ्या हे मी किती तास काम केलं, यापेक्षा मी कसं, काय काम करते, माझ्या कौशल्यासाठी पैसे देतात. त्यांनी फक्त तासांच्या हिशोबाने पैसे दिले असते तर ही रक्कम खूपच छोटी असती”, असेही तिने पुढे नमूद केलं.

सोशल मीडियावर युजर्सची काय रिॲक्शन ?

कुकरेजा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्यावर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिला तिच्या कामाचं स्वरुप, त्यात असं काय खास आहे, असे प्रश्न विचारले. तर काही जण मात्र तिची फी ऐकूनच अवाक् झाले. अनेकांनी काही मजेशीर कमेंट्स केल्या. ‘ एखाद्या फ्रेशरच्या CTC पेक्षाही ही (फी )आहे’, अशी कमेंट एका युजरने केली. तसेच काही युजर्सनी तिचे कौतुकही केले आहे. ‘हे पैसे फक्त तीन तासांचे नव्हे तर तुमच्या कामाच्या कौशल्यासात मिळाले आहेत. तुम्ही त्यासाठी ( कौशल्यासाठी) आयुष्यभर मेहनत केली आहे’, असे काहींनी नमूद केले.

रिपोर्ट्सनुसार, श्वेता कुकरेजा ही सोशल मीडिया एक्सपर्ट आहे. क्लाएंट्सचे पर्सनल ब्रांडिंग सुधारण्यासाठी ती मदत करते. तिच्या या अनोख्य यशस्वी स्टोरीने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....