Video | तरुणाची भन्नाट आयडिया, प्रेशर कुकरचा केला हेअर ड्रायर म्हणून वापर, व्हिडीओ व्हायरल

सध्या तर एक खळखळून हसायला लावणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुलांनी केलेले जुगाड चर्चेचा विषय़ ठरले आहे. 

Video | तरुणाची भन्नाट आयडिया, प्रेशर कुकरचा केला हेअर ड्रायर म्हणून वापर, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. सध्या तर एक खळखळून हसायला लावणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुलांनी केलेले जुगाड चर्चेचा विषय़ ठरले आहे.

प्रेशर कुकरच्या मदतीने तरुणांचं भन्नाट जुगाड

भारत देशात प्रतिभेची कमी नाही, असं सर्सास म्हटलं जातं. त्याची अनेक उदाहरणे आपण वेळोवेळी पाहिलेदेखील आहेत. काही लोकांची कलाकारी आपल्याला थक्क करुन सोडते तर काही तल्लख लोकांना पाहून त्यांना मदतीची गरज असल्याचे आपल्याला वाटते. पण आपल्या देशात असेदेखील काही लोक आहेत, ज्यांची जुगाडी वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. हे लोक टाकाऊ आणि स्वस्त वस्तूंपासून कामाच्या अनेक गोष्टी बनवतात. सध्या व्हायरल होत असलेल्या दोन तरुणांनी तर वेगळंच काहीतरी करुन दाखवलंय. या दोघांनी प्रेशर कुकरच्या मदतीने केस सुकवले आहेत. म्हणजेच त्यांनी कुकरचा हेअर ड्रायर म्हणून उपयोग केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण दिसत आहेत. यातील एका तरुणाने प्रेशर कुकर हातात घेतला आहे. तर दुसरा तरुण आपले केस वाळवत आहे. कुकरमधून निघणाऱ्या वाफेच्या मदतीने एक तरुण दुसऱ्या तरुणाच्या केसामध्ये वाफ भरतोय तर समोरचा तरुण याच वाफेच्या मदतीने केस कोरडे करतोय.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by black_lover__ox (@black_lover__ox)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटकऱ्यानी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ खूप मजेदार असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या एकाने हा खरा देसी जुगाड आहे, अशी प्रतिक्रिया दिलीय. सध्या हा व्हिडीओ black_lover__ox या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video: 9 वर्षाच्या चिमुरड्याचं पराठे बनवण्याचं कौशल्य पाहा, लोक म्हणाले, याच्यापुढे 5 स्टारचे शेफही पाणी भरतील!

Video: आग लगे चाहे बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में, भिवंडीत मांडवाला आग, पण भावांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन मटणावर!

Video : कॅडबरीची जाहिरात करणारा चटपट, व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुरड्या चटपटच्या क्युटनेसचे फॅन

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI