Income Tax: गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावर किती टॅक्स लागतो?

Gold | एखाद्या व्यक्तीकडे किती सोनं असावं किंवा एखाद्याकडून भेट मिळालेल्या सोन्यावर किती कर भरायचा, याबाबतही सरकारने नवे निय आखले आहेत.

Income Tax: गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावर किती टॅक्स लागतो?
सोन्याचे दागिने

मुंबई: भारतीयांना सोन्याविषयी असणारे आकर्षण ही काही नवी बाब नाही. आजही अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला (Gold) प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचा दर हा गगनाला भिडल्याने या धातूला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अजूनही लोक मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी करताना दिसतात.

मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ज्याप्रकारे परदेशातून सोने आणण्यावर मर्यादा आहेत. एखाद्या व्यक्तीकडे किती सोनं असावं किंवा एखाद्याकडून भेट मिळालेल्या सोन्यावर किती कर भरायचा, याबाबतही सरकारने नवे निय आखले आहेत.

आपल्याकडे अनेकदा लग्नात किंवा आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगावेळी कुटुंबीय आणि आप्तेष्टांकडून सोन्याच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. एका पिढीच्या लोकांकडून नव्या पिढीला हे सोन्याचे दागिने देण्यात आले असतील तर त्यावर कोणताही कर लागत नाही. याशिवाय, कुटुंबातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दागिने किंवा सोन्याची वस्तू दिली तरी त्यावर कर लागत नाही. मात्र, एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने तुम्हाला 50 हजारापेक्षा जास्त मूल्याची सोन्याची वस्तू भेट दिली तर त्यावर कर भरावा लागेल. तसेच तुम्ही भेट म्हणून मिळालेले सोने विकले तर त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन्सनुसार कर भरावा लागतो.

…तर घरातील सोनं जप्त होईल

प्राप्तिकर अधिनियम 1961च्या कलम 132 नुसार तपासादरम्यान जर संबंधित व्यक्ती सापडलेल्या कोणत्याही मूल्यवान वस्तूला किंवा दागिन्याच्या संदर्भात योग्य माहिती देऊ न शकल्यास किंवा उत्पन्नाचे योग्य स्त्रोत दाखवू न शकल्यास प्राप्तिकर अधिकारी जप्त त्या वस्तू जप्त करू शकतात. प्राप्तिकराशी निगडीत कोणत्याही प्रकरणात जर संबंधित व्यक्तीने मागील वर्षी भरलेला प्राप्तिकर हा विकत घेतलेल्या सोन्याच्या किंमतीशी मेळ खात नसल्यास प्राप्तिकर अधिकारी सोन्याचे दागिने किंवा मूल्यवान वस्तू यांना जप्त करू शकतात. पण एका विशिष्ट मर्यादेच्या खाली आयकर विभागही सोन्याचे दागिने जप्त करु शकत नाही.

संबंधित बातम्या:

तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी कसा फायदा? जाणून घ्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI