तुम्ही जर ‘हे’ काम केले नाहीत, तर तुमच्या मुलांचे आधार कार्ड होऊ शकते निष्क्रिय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पाच वर्षांनंतर मुलाच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी पालक थेट यूआयडीएआयच्या वेबसाइटवर लॉग इन करू शकतात. या माध्यमातून अपॉईंटमेंट बुक करू शकतात. नंतर मुलाला जवळच्या आधार केंद्रावर घेऊन जाता येईल.

तुम्ही जर ‘हे’ काम केले नाहीत, तर तुमच्या मुलांचे आधार कार्ड होऊ शकते निष्क्रिय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 31, 2021 | 8:06 AM

नवी दिल्ली : आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे काही महत्त्वाचे ओळखीचे पुरावे आहेत. यापैकी एक प्रमुख पुरावा म्हणजे आधार कार्ड. हे आधार कार्ड लहान मुलांचे किंवा प्रौढांचे, आपल्याला याबाबतीत विशेष सावधानता बाळगावीच लागते. लहान मुलांच्या आधार कार्डबाबतही पालकांना अशीच सावधानता दाखवावी लागणार आहे. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीने ( UIDAI) म्हटले आहे की, मुल 5 वर्षांचे झाल्यावर बायोमेट्रिक्स अपडेट न झाल्यास मूलाचे आधार कार्ड निष्क्रिय होते. (If you do not do this, your child’s Aadhaar card may become inactive)

यूआयडीएआयने यासंदर्भात ट्वीट केले आहे. ‘तुमच्या मुलाच्या वयाच्या 5 व्या वर्षी आणि नंतर वयाच्या 15 व्या वर्षी आधारमध्ये बायोमेट्रिक्स अपडेट करणे लक्षात ठेवा. मुलांसाठी हे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत आहेत. आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन पालकांना हे अपूर्ण काम पूर्ण करता येऊ शकते’ असे यूआयडीएआयने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर कले आहे.

अपडेटसाठी यूआयडीएआयच्या वेबसाइटवर लॉग इन करा

तुमच्या जवळच्या आधार नावनोंदणी केंद्राचा शोध घेण्यासाठी https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या माध्यमातून तुम्हाला बुकिंग करता येते. यूआयडीएआयने म्हटले आहे की, 5 वर्षांच्या मुलाचे बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जेव्हा तेच मूल 15 वर्षांचे होईल, तेव्हा पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. पाच वर्षांनंतर मुलाच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी पालक थेट यूआयडीएआयच्या वेबसाइटवर लॉग इन करू शकतात. या माध्यमातून अपॉईंटमेंट बुक करू शकतात. नंतर मुलाला जवळच्या आधार केंद्रावर घेऊन जाता येईल.

अपॉईंटमेंट बुक करण्याची पद्धत

– यूआयडीएआयच्या वेबसाईटच्या https://appointments.uidai.gov.in/ या लिंकवर जा. – येथे तुम्हाला My Aadhaar या पर्यायावर क्लिक करावे लागेल. – त्यानंतर ड्रॉप डाऊनमध्ये दिलेल्या पर्यायांमधून ‘Book An Appointment’ निवडा. – आता एक नवीन पेज उघडेल. – येथे आपण शहर किंवा स्थान निवडा. – यानंतर तुम्हाला खाली ‘Book Appointment’ च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. -आता पुन्हा एक नवीन पेज उघडेल. – येथे तुमच्याकडे आधार अपडेट, नवीन आधार आणि अपॉईंटमेंट्स हे तीन पर्याय असतील. – आता नवीन पेज उघडल्यावर आधार अपडेट निवडल्यानंतर नवीन पेज उघडेल. – येथे तुम्हाला आधार क्रमांक, आधारमध्ये नोंदवलेले नाव तसेच आधार सेवा केंद्र निवडावे लागेल. – यानंतर वैयक्तिक तपशील भरावा लागेल. – मग आपल्याला वेळेचा स्लॉट निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमच्यासमोर अपॉईंटमेंटचा तपशील येईल. तो तपशील कन्फर्म केल्यानंतर तुमची अपॉईंटमेंट बुकींग होईल. (If you do not do this, your child’s Aadhaar card may become inactive)

इतर बातम्या

श्रावण महिन्यात सुवासिनींनी या 6 गोष्टी कराव्यात; अखंड सौभाग्यप्राप्ती होते !

साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें