Income Tax Deadline: मोदी सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा; TDS रिटर्न, फॉर्म-16 भरण्याची मुदत वाढवली

Income Tax | फॉर्म-16 भरण्याची मुदतही 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 जुलै होती. याशिवाय, विवाद से विश्वास स्कीम (Vivad se Vishwas scheme) योजनेतंर्गत थकबाकी असलेल्या कराची रक्कम चुकती करण्यासाठीही 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Income Tax Deadline: मोदी सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा; TDS रिटर्न, फॉर्म-16 भरण्याची मुदत वाढवली
income tax department
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:30 PM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक व्यवहार ठप्प असल्यामुळे मोदी सरकारने करदात्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार TDS रिटर्न आणि फॉर्म-16 भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 2020-21 या चौथ्या तिमाहीचे TDS स्टेटमेंट सबमिट करण्यासाठी करदात्यांना 15 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 30 जून होती. (Income Tax Deadline TDS Form 16 submition extended)

तर दुसरीकडे फॉर्म-16 भरण्याची मुदतही 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 जुलै होती. याशिवाय, विवाद से विश्वास स्कीम (Vivad se Vishwas scheme) योजनेतंर्गत थकबाकी असलेल्या कराची रक्कम चुकती करण्यासाठीही 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

घर खरेदी करणाऱ्यांना सूट

पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीवर मिळणाऱ्या करमाफीत सूट देण्यात आली आहे. एखाद्याने रहिवाशी घरात गुंतवणूक केली तर त्याला आणखी 3 महिन्यांसाठी टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळेल.

पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

कोरोना संकटामुळे सध्या दैनंदिन व्यवहार आणि इतर कामकाज करण्यात बऱ्याच समस्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पॅनकार्ड (Pancard) आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. तसेच ITR फाईल करण्यासाठीही अतिरिक्त अवधी देण्यात आला आहे. (link pan card to Aadhar card deadline extended till 30 September 2021)

त्यानुसार आता PAN Card आधारला लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. यापूर्वी 30 जून ही अंतिम मुदत होती. मात्र, ही मुदत तीन महिन्यांनी वाढवल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

‘या’ बँकेत तुमचे खाते आहे का? 1 जुलैपासून IFSC कोड बदलणार

काही दिवसांपूर्वीच सिंडिकेट बँकेचे (Sydicate Bank) कॅनरा बँकेत (Canera Bank) विलिनीकरण झाले होते. त्यामुळे आता बँकेच्या व्यवहारात मोठे बदल होणार आहे. परिणामी सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कॅनरा बँकेने सिंडिंकेट बँकेचा IFSC कोड बदलला असून नवा कोड 1 जुलैपासून वापरात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जुन्या चेकबुकचा वापर करून व्यवहार करायचे असल्यास फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर सिंडिकेट बँकेचे चेकबुक हे निरुपयोगी ठरेल.

संबंधित बातम्या:

Aadhaar Pan Linking: पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, आता शेवटची तारीख कोणती?

PAN Aadhaar Linking: 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द, भरावा लागणार दंड

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.