एलआयसीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजेत

LIC IPO | केंद्र सरकारने या आयपीओमधील 10 टक्के समभाग हे पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवले आहेत. या लोकांना इतरांपेक्षा स्वस्त दरात समभाग मिळतील. आजघडीला एलआयसीचे जवळपास 28.9 कोटी पॉलिसीधारक आहेत.

एलआयसीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजेत
Life Insurance Corporation of India (LIC)
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 11:46 AM

मुंबई: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या खासगीकरण प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत एलआयसीची (LIC) प्रारंभिक खुली भागविक्री (IPO) होईल, असा अंदाज आहे. एलआयसीची विश्वासर्हता पाहता हा आयपीओ बाजारपेठेत आल्यानंतर गुंतवणुकदारांच्या त्याच्यावर उड्या पडतील.

मात्र, या IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या आयपीओमधील 10 टक्के समभाग हे पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवले आहेत. या लोकांना इतरांपेक्षा स्वस्त दरात समभाग मिळतील. आजघडीला एलआयसीचे जवळपास 28.9 कोटी पॉलिसीधारक आहेत.

आयपीओच्या नियमानुसार कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आयपीओमधील समभागांच्या खरेदीसाठी कमाल 10 टक्क्यांची सूट देऊ शकते. मात्र, एलआयसी पॉलिसीधारकांसाठी तसे कोणतेही बंधन नसेल. त्यामुळे पॉलिसीधारकांना IPO साठी किती टक्के सूट दिली जाणार, हे पाहावे लागेल. या IPO साठी केंद्र सरकारने एलआयसी कायदा, 1956 मध्ये सुधारण केल्या आहेत. एलआयसी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर या कंपनीलाही सेबीच्या नियमांचे पालन करावे लागेल. दर तीन महिन्यांनी एलआयसीला फायदा-तोट्याचा आर्थिक अहवाल सादर करावा लागेल.

समभागाची किंमत ठरणार महत्वाचा घटक

हा आयपीओ भांडवली बाजारात आल्यानंतर समभागाची किंमत हा सर्वात महत्वाचा घटक ठरेल. कारण यापूर्वी सरकारी विमा कंपन्यांच्या आयपीओबाबत फारसा चांगला अनुभव नाही. 2017 मध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ बाजारपेठेत आला होता. त्यावेळी एका समभागाची किंमत 770-800 रुपये इतकी होती. त्यानंतर हा समभाग 748.90 रुपयांना लिस्ट झाला होता. मात्र, आता या समभागाची किंमत अवघी 158 रुपये आहे. हाच प्रकार जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबाबत घडला. या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा समभाग 857.50 रुपयांना लिस्ट झाला. मात्र, आज याच समभागाची किंमत अवघी 174 रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या:

…म्हणून मोदी सरकार एलआयसीचा IPO दोन टप्प्यांत आणणार?

Jandhan Account: एसबीआय बँकेच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या सर्वकाही?

PM Pension Yojana: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि प्रत्येकवर्षी मिळवा 1.1 लाख रुपये

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.