‘या’ तारखेपर्यंत भरा ITR रिटर्न, नाही तर भरा 5 हजार दंड
तुम्ही जर ITR भरला नसेल तर 15 जानेवारी ही डेडलाइन असल्याने ते लवकर करा. नव्या कर प्रणालीत ७ लाखांपर्यंत आणि जुन्या कर प्रणालीत ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेले करदाते सवलतीचा दावा करू शकतात. ई-फायलिंगसाठी ITR पोर्टलवर लॉगिन करा आणि योग्य फॉर्म भरा.

इन्कम टॅक्स सवलतीसाठी तुम्ही (ITR) आयकर रिटर्न भरला नसेल तर लवकर करा, कारण डेडलाइनला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. इन्कम टॅक्सच्या पात्र करदात्यांसाठी सुधारित किंवा उशीरा ITR दाखल करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी आहे. जर तुम्ही या १५ जानेवारीपर्यंत तुमचा आयकर रिटर्न भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल, त्यातच हा दंड तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांनी उशीरा आयकर रिटर्न भरला तर 1,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्नावर 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.
कोण दावा करू शकेल?
नव्या कर प्रणालीत ७ लाख रुपयांपर्यंत आणि जुन्या कर प्रणालीत ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले करदाते या वाढीव मुदतीत त्यांचा ITR दाखल करू शकतात. 5 जुलै रोजी इन्कम टॅक्स विभागाने त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले होते, ज्यामुळे करदात्यांना तांत्रिक अडचणींमुळे दावा करू शकत नव्हते. यानंतर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर न्यायालयाने मुदतवाढ देण्याचे आदेश दिले.
तुम्ही किती सवलतीचा दावा करू शकता?
नव्या कर प्रणालीत ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेले करदाते २५,००० रुपयांपर्यंत सवलतीचा दावा करू शकतात, तर जुन्या कर प्रणालीत ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले करदाते १२,५०० रुपयांपर्यंत सवलतीचा दावा करू शकतात.




शेवटच्या तारखेनंतर आकारण्यात येणार दंड
इन्कम टॅक्स विभागाने आयटीआर फॉर्म-२ आणि ३ साठी एक्सेल युटिलिटीज अपडेट केल्या आहेत. करदात्यांना सवलतीचा कॉलम मॅन्युअली भरावा लागेल. शेवटच्या तारखेनंतर, विलंब शुल्क तुमच्या उत्पन्नानुसार 1,000 ते 5,000 पर्यंत असू शकते.
ई-फायलिंग कसे करावे
तुमच्या इन्कम टॅक्सची गणना करा आणि Form 26AS मधून TDS चा सारांश बनवा
तुमच्यासाठी योग्य आयटीआर फॉर्म निवडा.
Income Tax e-filing वेबसाइटला भेट द्या आणि ‘लॉग इन’वर क्लिक करा.
त्यानंतर नवीन वापरकर्त्यांची नोंदणी करा.
तुमचे युजरनेम (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा आणि ‘कंटिन्यू’ वर क्लिक करा.
‘‘e-file’ टॅबवर क्लिक करा आणि ‘फाइल इन्कम टॅक्स’ निवडा.
ज्या वर्षासाठी रिटर्न करायचा आहे ते वर्ष निवडा आणि ‘कंटिन्यू’ वर क्लिक करा.
‘Individual’, ‘HUF’ किंवा ‘इतर’ मधून आपली श्रेणी निवडा आणि कंटिन्यूवर क्लिक करा.
ITR1, ITR2 सारखे योग्य आयटीआर फॉर्म निवडा आणि ‘प्रोसीड’ वर क्लिक करा.
उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त किंवा कलम 139 (1) अन्वये अर्ज दाखल करण्याचे कारण निवडा.
तुमच्या बँक खात्याची माहिती भरा आणि ती पूर्व-पडताळणी करा.
तुम्ही स्वत: भरलेले तपशील तपासा, खात्री करा.
तुमच्या रिटर्न फाईलची पुन्हा एकदा पडताळणी करा आणि त्याची एक हार्ड कॉपी आयकर विभागाकडे पाठवा. त्याची पडताळणी बंधनकारक असणार आहे.