अगदी माफक भांडवलात सुरु करा दूध डेअरीचा व्यवसाय, नाबार्डकडून कर्जावर 25 टक्के अनुदान

दूध डेअरीच्या व्यवसायात तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करु शकता. अगदी दोन गायी-म्हशींपासूनही तुमच्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. सरकार पशुपालनालाही प्रोत्साहन देत आहे. यासाठी अनेक योजना देखील चालवल्या गेल्या आहेत. या सरकारी योजनांचा लाभ घेऊन तुम्ही दूध डेअरीचे काम सुरू करू शकता. | dairy business

अगदी माफक भांडवलात सुरु करा दूध डेअरीचा व्यवसाय, नाबार्डकडून कर्जावर 25 टक्के अनुदान
दूग्ध व्यवसाय

 मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता. अशाच एका जोडधंद्यापैकी एक म्हणजे दूग्ध व्यवसाय. दुधाची डेअरी सुरु करायची असल्यास तुम्हाला अनुदान मिळते. त्यामुळे या व्यवसायातील भांडवल उभारणीची समस्या बऱ्याच अंशी दूर होते. दूध डेअरीच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याकाठी चांगली कमाई करु शकता.

दूध डेअरीच्या व्यवसायात तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करु शकता. अगदी दोन गायी-म्हशींपासूनही तुमच्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. सरकार पशुपालनालाही प्रोत्साहन देत आहे. यासाठी अनेक योजना देखील चालवल्या गेल्या आहेत. या सरकारी योजनांचा लाभ घेऊन तुम्ही दूध डेअरीचे काम सुरू करू शकता.

पशुसंवर्धनात सरकार दुग्ध उद्योगाला भरपूर मदत करत आहे. गाय आणि म्हशीच्या खरेदीसाठी कर्ज देण्यापासून दूध प्रक्रिया प्रकल्प, दूध डेअरी इत्यादी उघडण्यासाठी तांत्रिक माहितीसह आर्थिक सहाय्य देखील प्रदान केले जात आहे.

डेअरी उद्योजकांसाठी ‘नाबार्ड’कडून कर्ज

केंद्र सरकारने डेअरी उद्योजकता विकास योजना अर्थात DEDS (डेअरी उद्योजकता विकास योजना- DEDS) चालवली आहे. DEDS योजनेअंतर्गत, पशुपालकांना प्रकल्पाच्या एकूण खर्चावर 33 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना नाबार्ड अंतर्गत येते. म्हणून, नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) डीईडीएससाठी कर्जमाफी प्रदान करते.

डीईडीएस योजनेत 10 म्हशींच्या दुग्धव्यवसायासाठी 7 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. सामान्य प्रवर्गातील लोकांना 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी आहे. महिलांच्या कोणत्याही श्रेणीसाठी किंवा आरक्षित वर्गासाठी अनुदानाचा दर 33.33 टक्के आहे. जर तुम्हाला छोट्या प्रमाणावर काम सुरू करायचे असेल तर तुम्ही दोन गाई किंवा म्हशींसह डेअरी सुरू करू शकता. दोन जनावरांसाठी तुम्हाला 35 ते 50 हजार रुपयांचे अनुदान मिळू शकते.

जर तुम्हाला मिल्क डेअरी प्लांट उघडायचा असेल तर मिल्क प्लांटच्या एकूण खर्चाच्या फक्त 10 टक्के तुमच्या खिशातून गुंतवावे लागतील. लक्षात ठेवा की DEDS योजनेअंतर्गत आकारले जाणारे डेअरी प्लांट हा कर्ज मंजुरीच्या 9 महिन्यांच्या आत सुरू झाला पाहिजे. कारण जर प्लांट सुरू होण्यास 9 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला तर अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

कर्ज कसे मिळवाल?

डीईडीएस योजनेअंतर्गत दिलेली सबसिडी बॅक एन्डेड सबसिडी असेल. याचा अर्थ असा की ज्या बँकेकडून कर्ज घेतले गेले आहे, ‘नाबार्ड’ अनुदानाची रक्कम त्याच बँकेला देईल.

डेअरी प्लांटसाठी प्रकल्प तयार करा. त्यात डेअरी प्लांटचे स्थान, जनावरांची संख्या, खर्च इत्यादी सर्व माहिती असावी. आता या प्रकल्पासाठी नाबार्डने अधिकृत केलेल्या बँकेत जा आणि कर्जासाठी अर्ज करा. योजनेअंतर्गत, बँक तुम्हाला डेअरी प्लांटसाठी शेड बांधण्यासाठी, गाय-म्हैस खरेदीसाठी, गाय-म्हैस दुग्ध मशीन खरेदी करण्यासाठी, चारा आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज देईल.

संबंधित बातम्या:

Amul Franchisee Registraion : Amul ची फ्रँचायझी घ्या आणि लाखो कमवा, 2 लाखांवर थेट 10 लाखांचा फायदा

शेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही

चव म्हटलं की चितळे! भिलवडीतून सुरू केलेला व्यवसाय जगभर पोहोचवला, कोण आहेत भास्कर चितळे?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI