मोठी बातमी: 20 जुलैपासून ऑक्सिमीटरसह पाच वैद्यकीय उपकरणे होणार स्वस्त

मोठी बातमी: 20 जुलैपासून ऑक्सिमीटरसह पाच वैद्यकीय उपकरणे होणार स्वस्त
ऑक्सिमीटर

सध्या या वैद्यकीय उपकरणांवर 3 ते 709 टक्के मार्जिन आकारले जाते. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन या मार्जिनवर निर्बंध आणले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांकडून दंड आकारला जाईल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 14, 2021 | 1:05 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ऑक्सिमीटरसह पाच वैद्यकीय उपकरणांच्या किंमतीवर निर्बंध लादले आहेत. या उपकरणांच्या विक्रीसाठी 70 टक्के इतकी मार्जिन निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 20 जुलैपासून ही पाच उपकरणे स्वस्त होतील. यामध्ये ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर, रक्तदाब तपासण्याचे मशीन, नेब्युलाईझर आणि डिजिटल थर्मामीटरचा समावेश आहे.

सध्या या वैद्यकीय उपकरणांवर 3 ते 709 टक्के मार्जिन आकारले जाते. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन या मार्जिनवर निर्बंध आणले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांकडून दंड आकारला जाईल.

याशिवाय, केंद्र सरकारने म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एम्फोटेरिसीन बी हे इंजेक्शन आणि कोरोना चाचणीचे किट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयातशुल्क हटवले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीही स्वस्त होण्याची शक्यता आहे.

रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने म्युकरमायकोसिस आणि कोरोनाच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. रेमडेसिवीरील जीएसटी दर 12 टक्क्यावरून कमी करून 5 टक्के करण्यात आला. Tocilizumab, Amphotericin B ही ब्लॅक फंगसची औषधे पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्यात आली होती. तर मेडिकल ग्रेड ऑक्सिजनसाठीचा जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा

कोरोना औषधांवरील जीएसटी हटवल्यास रुग्णांना आर्थिक फटका बसणार; औषधे महाग होणार

कोरोनावरील उपचार आणखी स्वस्त, औषधांवरील जीएसटीमध्ये कपात, अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें