फोर्ड कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार, मग कर्मचारी आणि ग्राहकांचं काय होणार?

Ford company | दुसरीकडे फोर्ड कंपनीची वाहने असलेल्या ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी फोर्ड कंपनी आपल्या डिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवत राहील. फोर्ड कंपनीकडून गाड्यांच्या इंजिन निर्यातीसाठीचे युनिट सुरु ठेवले जाऊ शकते.

फोर्ड कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार, मग कर्मचारी आणि ग्राहकांचं काय होणार?
फोर्ड कंपनी

मुंबई: जगातील सुप्रसिद्ध फोर्ड ही वाहन उत्पादक कंपनी भारतामधील आपला व्यवसाय बंद करणार आहे. गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत FORD कंपनीच्या वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळेच फोर्ड कंपनीने भारतामधील आपले दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता फोर्ड कंपनीच्या भारतामधील कर्मचारी आणि ग्राहकांचं काय होणार, हा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला आहे. चेन्नई आणि गुजरातच्या साणंद येथे फोर्ड कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. हे प्रकल्प बंद पडल्याने येथील तब्बल 4000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. कंपनीकडून कमीतकमी कर्मचाऱ्यांना फटका बसेल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे फोर्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे फोर्ड कंपनीची वाहने असलेल्या ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी फोर्ड कंपनी आपल्या डिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवत राहील. फोर्ड कंपनीकडून गाड्यांच्या इंजिन निर्यातीसाठीचे युनिट सुरु ठेवले जाऊ शकते. तसेच कंपनीची सप्लाय चेन सुरळीत राहावी, यासाठी फोर्ड कंपनीचे लहानसे नेटवर्क कार्यरत राहील.

कंपनीला भारतातील प्रकल्प का बंद करावे लागणार?

बऱ्याच काळापासून फोर्ड कंपनी भारतात मोठे नुकसान सहन करत आहे. त्यामुळे आता फोर्ड कंपनी आपल्या काही कार आयात करुन देशात विकत राहील. तसेच डिलर्सना विद्यमान ग्राहकांना सेवा देण्यासाठी देखील मदत करेल.

फोर्ड आणि महिंद्र यांनी भागीदारी करणे अपेक्षित होते. तथापि, 1 जानेवारी 2021 रोजी दोन्ही निर्मात्यांनी सौहार्दपूर्ण घोषणा केली की, जॉइंट वेंचर बंद आहे आणि दोन्ही उत्पादक स्वतंत्र मार्गाने जातील. फोर्ड आणि महिंद्रा वाटाघाटीच्या प्रगत टप्प्यावर असताना, इतर उत्पादकांशी करार तयार करण्याच्या चर्चेनंतर फोर्ड शांत बसली. जॉइंट वेंचर यशस्वी झाला असता, तर फोर्डच्या मरायमलाई नगर आणि सानंद प्लांटमध्ये उत्पादन दरवर्षी सुमारे 40,000 युनिट्स झाले असते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतेक उत्पादकांचे देशात मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठ संकुचित झाली आहे, ज्यामुळे कारखाने त्यांच्या एकूण क्षमतेपेक्षा कमी काम करीत आहेत.

जगातील जुन्या कंपन्यांपैकी एक

फोर्ड ही जगातील सर्वात जुन्या वाहननिर्माता कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी दोन महायुद्धांची साक्षीदार राहिली आहे. तब्बल 125 वर्ष जुन्या असलेल्या या कंपनीची सूत्रे अजूनही फोर्ड परिवाराकडेच आहेत.

संबंधित बातम्या:

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, ‘या’ कारणामुळे सर्वच वाहन कंपन्या तोट्यात

आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन दिन : BMC चे इलेक्ट्रिक वाहन महापौर पेडणेकरांकडे सुपूर्द, पालिकेच्या ताफ्यात 5 EV

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI