क्रेडिट कार्डाचा अर्ज वारंवार फेटाळला जातोय, जाणून घ्या काय असू शकते कारण?

Credit card | एकापाठोपाठ अनेकदा क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केल्यास तुमचा अर्ज रद्द ठरवला जाऊ शकतो.  बँका क्रेडिट कार्ड देताना तुमचे उत्पन्न तपसतात. तुमच्या उत्पन्नाचा स्रोत स्थिर नसेल किंवा त्याविषयी शाश्वती नसेल तर बँका क्रेडिट कार्ड देत नाहीत.

क्रेडिट कार्डाचा अर्ज वारंवार फेटाळला जातोय, जाणून घ्या काय असू शकते कारण?
इंडसइंड बँकेने विस्तारा विमान कंपनीसोबत सुरू केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 8:00 AM

मुंबई: अनेकांना क्रेडिट कार्ड घ्यायची इच्छा असूनही बँकेचे नियम आणि अटींमुळे ते मिळत नाही. अशावेळी एखाद्या ऑनलाईन ऑफरचा किंवा कॅशबॅकचा लाभ उठवण्यासाठी अनेकजण दुसऱ्याच्या क्रेडिट कार्डावरुन खरेदी करतात. काहीवेळा वारंवार अर्ज करूनही बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड द्यायला तयार नसतात.

बँकेकडून क्रेडिट कार्ड नाकारले जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असणे. याशिवाय, एकापाठोपाठ अनेकदा क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केल्यास तुमचा अर्ज रद्द ठरवला जाऊ शकतो.  बँका क्रेडिट कार्ड देताना तुमचे उत्पन्न तपसतात. तुमच्या उत्पन्नाचा स्रोत स्थिर नसेल किंवा त्याविषयी शाश्वती नसेल तर बँका क्रेडिट कार्ड देत नाहीत.

‘या’ गोष्टी टाळण्याची गरज

1. कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता याचा माग ठेवला जातो. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल केली तर भविष्यात ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.

2. तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो. तुम्ही कोणतेही कर्ज घेता तेव्हा हा तपशील पाहिला जातो. तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले आणि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकवले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.

3. तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट युटिलायझेन रेट नेहमी 30 टक्क्यांच्या आसपास राहील याची काळजी घ्या.

4. क्रेडिट कार्डाची लिमीट वाढवणे हे युटिलायझेशन रेट वाढवण्याच्यादृष्टीने चांगले ठरते. मात्र, तुम्ही क्रेडिट लिमीट कमी केलीत तर हा रेटही घटतो. समजा एक लाख रुपयांची लिमीट असलेल्या क्रेडिट कार्डावर आऊटस्टँडिंग ड्युज 25000 असेल. मात्र तुम्ही क्रेडिट लिमिट घटवून 60 हजार केली तर युटिलायझेशन रेट 25 टक्क्यांवरून वाढून 42 टक्क्यांवर पोहोचेल.

5. तुम्ही एखादे कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्ही निर्धास्त होता. मात्र, याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तुम्ही सिक्योर्ड लोन घेतले असेल तर लोन फोरक्लोझरमुळे क्रेडिट हिस्ट्री कमी होते. तसेच लोन फोरक्लोझरसाठी बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात.

संबंधित बातम्या:

क्रेडिट कार्ड नसेल तरीही हप्त्यांवर खरेदी करु शकता; जाणून घ्या सर्वकाही

PHOTO | एसबीआय ग्राहक स्मार्टफोनला असे बनवू शकता क्रेडिट कार्ड! फोन दाखवताच कापले जातील पैसे

एसबीआय कार्डने फॅबइंडियासोबत लाँच केले कॉन्टॅक्टलेस को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, गिफ्ट व्हाउचरसह मिळतील हे फायदे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.