भंडारा-गोंदिया : नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांच्या अनुपस्थितीत नवखे उमेदवार मैदानात

LOKSABHA ELECTION 2019 : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असला, तरी 2014 साली नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करुन, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर नाराज होत, नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, नाना पटोले या मतदारसंघातून लढण्याऐवजी नागपुरातून गडकरींविरोधात लढत आहेत. त्यामुळे […]

भंडारा-गोंदिया : नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांच्या अनुपस्थितीत नवखे उमेदवार मैदानात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

LOKSABHA ELECTION 2019 : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असला, तरी 2014 साली नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करुन, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर नाराज होत, नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, नाना पटोले या मतदारसंघातून लढण्याऐवजी नागपुरातून गडकरींविरोधात लढत आहेत. त्यामुळे आघाडीकडून इथून नाना पंचबुद्धे रिंगणात आहेत. तर सुनील मेढें हे भाजपकडून लढत आहेत.

प्रशासनाने मतदानाची जोरदार तयारी केली आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी एकूण 9 लाख 83 हजार 693 इतके मतदार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यात 8 लाख 25 हजार 255 मतदार आहेत. एकूण हे दोन्ही जिल्हे मिळून 18 लाख 8 हजार 948 इतके मतदार मतदान करणार आहेत. तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकूण 2184 इतके मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर 10 हजार 539 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तीन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात 12 अतिसंवेदनशील केंद्र घोषित करण्यात आले असून पोलीस आणि निवडणूक विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. विशेष बाब म्हणजे दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर देण्यात आल्या आहेत. मतदारसंघात 4 हजार 872 दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्याकरिता 286 व्हीलचेअर आणि एकूण 1071 रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी, सालकेशा, अर्जुनी मोरगाव या तीन तालुक्यात मतदानाची वेळ सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत ठवेण्यात आली असून इतर तालुक्यात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

  • सुनील मेंढे – भाजप
  • नाना पंचबुद्धे – राष्ट्रवादी
  • एन. के. नान्हे – वंचित बहुजन आघाडी

निवडणुकीच्या तारखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.