मोदी आणि राहुल गांधींनी सभा घेतलेल्या वर्ध्यातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

LOKSABHA ELECTION 2019 : वर्ध्यात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारासह वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही तुल्यबल असल्याने इथली लढतही चुरशीची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस, काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी रिंगणात आहेत. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. तर चारुलता टोकस यांच्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी वर्ध्यात …

मोदी आणि राहुल गांधींनी सभा घेतलेल्या वर्ध्यातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

LOKSABHA ELECTION 2019 : वर्ध्यात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारासह वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही तुल्यबल असल्याने इथली लढतही चुरशीची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस, काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी रिंगणात आहेत. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. तर चारुलता टोकस यांच्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी वर्ध्यात सभा घेतली होती.

  • रामदास तडस – भाजप
  • चारुलता टोकस – काँग्रेस
  • धनराज वंजारी – वंचित बहुनज आघाडी

निवडणुकीच्या तारखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *