36 जिल्हे 72 बातम्या | 21 October 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या संबंधित साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी तसंच त्यांच्या दोन-तीन बहिणींच्या घरीही आयकर विभागाने केलेली कारवाई..!

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या संबंधित साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी तसंच त्यांच्या दोन-तीन बहिणींच्या घरीही आयकर विभागाने केलेली कारवाई..! तपास यंत्रणांनी अजित पवारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्कर्ते चांगलेच पेटले आहेत. पुण्यातील दक्षिण भागांत अजितदादांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. बॅनरवरील अजितदादांचा फोटो मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, कारण त्यावर अजितदादांच्या हातात तलवार असल्याचा फोटो आहे..!

अजित पवार सध्या आयकर विभागाच्या कारवायांनी दुखावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भावनिक होत, ‘माझ्यावर काय कारवाई करायती ती करा, छापेमारी करा, पण अजितदादांच्या बहिणी म्हणून कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही’, असं म्हटलं. दादा भावनिक झालेत, हे कार्यकर्त्यांनी ओळखलं. अजित पवारांचा शुक्रवार-शनिवारी पुण्यात दौरा होता. लागलीच पुण्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढून दादांचं स्वागत केलं. आता रॅलीला 10 दिवसही पूर्ण होत नाही तोपर्यंत आता पुण्यातील दक्षिण भागांत अजितदादांच्या समर्थनार्थ बॅनर्स लागलेत. कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात हे बॅनर्स लागले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI