Special Report | पूजा चव्हाण प्रकरणात मोठा खुलासा; पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ tv9 च्या हाती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आलाय. पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्या निवडणुकीचं कॅम्पेनिंग करत होती, पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ tv9 च्या हाती

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:11 PM, 24 Feb 2021

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येतेय. आणि आता तर थेट वनमंत्री संजय राठोडांचे (Sanjay Rathod) काही व्हिडीओच समोर आलेत. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं सांगितलं जातंय. तसंच जे व्हिडीओ सध्या समोर आलेले आहेत, ते राठोडांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगचे असल्याचं कळतंय.