Chhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ

खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांच्या नेतृत्त्वात दुसरा मराठा मूक मोर्चा आज नाशिकमध्ये होत आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चास्थळी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली.

खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांच्या नेतृत्त्वात दुसरा मराठा मूक मोर्चा आज नाशिकमध्ये होत आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चास्थळी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. भुजबळ म्हणाले, “माझा किंवा राष्ट्रवादीचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीच. पण मराठा आरक्षणाला माझा विरोध असल्याचं भासवलं जात आहे. माझी आणि संभाजीराजेंची भेट होते आहे ही चांगलीच गोष्ट आहे”

मला काल आपल्या कार्यकर्त्यांनी आमंत्रण दिलं. छत्रपतींनीदेखील मला फोन केला. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताशी कोणाचंही दुमत नाही. माझ्या पक्षाची देखील तीच भूमिका आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं ही सगळ्यांची भूमिका आहे. अनेक अडचणी आहेत. ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण नाही आणि ओबीसींच आरक्षण काढलं, त्यामुळे दोन्ही समाजासमोर ही अडचण निर्माण झाली आहे, असं भुजबळ म्हणाले.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI