Gopichand Padalkar | कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पगार वाढीच्या ऑफरवर निर्णय : गोपीचंद पडळकर

आम्ही विलीनीकरणाच्या निर्णयावर ठाम आहोत, तसेच एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच पगार वाढीच्या ऑफरवर निर्णय होईल, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट झाली, हे मला माध्यमातून समजले आहे. सरकारकडून या बैठकीसाठी कोणी अधिकृत बोलत नाही. शरद पवार यांच्याकडे कोणतंच खातं नाही. तरी त्यांच्याकडे बैठक का ? असा रोखठोक सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मागील तेरा दिवसांपासून कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आज परब आणि पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीबाबत बोलताना पडळकर यांनी वरील वक्तव्य केले. आम्ही विलीनीकरणाच्या निर्णयावर ठाम आहोत, तसेच एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच पगार वाढीच्या ऑफरवर निर्णय होईल, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI