Gopichand Padalkar | फडणवीसांच्या आरोपामुळे संजय राऊत बावचळले, त्यांचं झिंग झिंग झिंगाट झालंय

महाराष्ट्रातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale in Maharashtra) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. यावर भाजपच्या वतीने टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 29, 2022 | 2:58 PM

महाराष्ट्रातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale in Maharashtra) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. यावर भाजपच्या वतीने टीकेची झोड उठवण्यात आली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा महाविकास आघाडीचा विचार आहे का, असा सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही तोंडसुख घेतले आहे. जनाब संजय राऊत (Sanjay Raut) हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. परदेशात वाईन मालकांच्या बैठकीचा ते खुलासा करतील, याची राऊतांना भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांचं झिंग झिंग झिंगाट झालंय, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना फायदा होणार नाही, असे स्पष्ट सरकारने सांगावे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें