‘नवाब मलिकांचे डी-गँगसोबत संबंध होते’ कोर्टाचं निरीक्षण! मलिकांचा पाय आणखी खोलात?

मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकरसोबत (Haseena Parkar & Nawab Malik) वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लॉड्रिंग केलं, असं प्राथमिक निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.

कृष्णा सोनारवाडकर

| Edited By: सिद्धेश सावंत

May 21, 2022 | 8:15 AM

मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik ED News) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे डी गँगसोबत संबंध होते, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवल्यांचं सांगण्यात येतंय. मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीनं (ED on Nawab Malik) चार्जशीट दाखल केली होतं. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट नवाब मलिकांनी रचल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिकांवर ठेवलाय. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकरसोबत (Haseena Parkar & Nawab Malik) वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लॉड्रिंग केलं, असं प्राथमिक निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. रोकडे यांच्या खंडपिठानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक यांचा दाऊदच्या गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्यानं आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें