सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य केलंय. बाळासाहेब ठाकरेंबद्दल त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. “माझ्या राजकीय यशाचे श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जातं. मला घडवण्यात त्यांचा हात राहिला आहे.बाळासाहेब ठाकरेंनी मला परिपक्व केलं. त्यामुळे मला कुठेही टाकलं तर मी कमी पडणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना नारायण राणे दिलखुलासपणे उत्तर देत होते.यावेळी राणेंनी आपल्या कारकीर्दविषयी अनेक गोष्टी मुलांशी शेअर केल्या ध्यानीमनी नसताना आपल्याला केंद्रीयमंत्रीपद कस मिळालं याचा किस्सा ही नारायण राणेंनी विद्यार्थ्यांना सांगितला.