सत्यजित तांबे यांच्या ‘या’ भूमिकेचं राष्ट्रवादीकडून स्वागत

सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर अभिनंदन करताना अमोल मिटकरी यांनी वेलकम म्हणत केले ट्विट...

सत्यजित तांबे यांच्या 'या' भूमिकेचं राष्ट्रवादीकडून स्वागत
| Updated on: Feb 03, 2023 | 12:59 PM

मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला. सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. सत्यजित तांबे यांच्या विजयाचे अभिनंदन करताना त्यांनी वेलकम असे ट्विट केले आहे. संघर्षाच्या काळात संयम ठेवून कसं जिंकता येतं हा नवीन परिपाठ, तसेच जवळचा मित्र गमावल्यानंतर आनंदोत्सव साजरा न करण्याचा आपला निर्णय हा नव्या पिढीसमोर आदर्श म्हणावा लागेल. आपले मनःपूर्वक स्वागत..वेलकम…, असे देखील त्यांनी त्यांच्याट्विटमध्ये म्हटले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. सत्यजित तांबे हे भरघोस मतांनी विजयी झाले. सत्यजित तांबे यांनी 68 हजार 999 मतं मिळवली आणि ते विजयी झालेत. मात्र या विजयानंतरही सत्यजित तांबे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणताही आनंदोत्सव साजरा करू नका असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.