Beed | बीडमध्ये पावसामुळं मोठं नुकसान, पंकजा मुंडेंकडून पाहणी, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका

मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा सर्वच जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली.

Beed | बीडमध्ये पावसामुळं मोठं नुकसान, पंकजा मुंडेंकडून पाहणी, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका
| Updated on: Sep 28, 2021 | 4:06 PM

मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा सर्वच जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पिकाच्या नुकसान भरपाईसह जमिन खरवडून गेल्यानं त्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बीड जिल्हा दौऱ्यावरही त्यांनी टीका केलीय.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. तसंच गेवराई, माजलगाव आणि परळीत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. जयंत पाटील यांच्या या दौऱ्यावर पंकजा मुंडे यांनी टीका केलीय. बीड जिल्ह्यात मोबाईल वाजला मदत आली असं शेतकऱ्यांना वाटायचं. पण आता या सरकारमध्ये कसलीच मदत नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा बीड दौरा झाला. मात्र, एकाही बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जयंत पाटलांच्या दौऱ्यावर टीका केलीय.

Follow us
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.