मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यासह गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं वैनगंगेच्या नदीपात्रात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, वैनगंगेच्या प्रवाहित पाण्यात एका पशुपालकाच्या दहा ते बारा म्हैस सापडल्यानं त्या वाहून गेल्यात.