देशातील दोन नंबरची मिरची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. सध्या दररोज सुमारे १०० वाहनांमधून मिरची विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहे. मागील वर्षी सुमारे दोन लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती, तर यावर्षी पावणे दोन लाख क्विंटलपर्यंत आवक नोंदवली गेली आहे. सुरुवातीला आवक घटेल असा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र हंगाम अखेरपर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक आवक झाली आहे.