आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे ते दिल्ली तब्बल १०७० किलोमीटरच्या पायी प्रवासाला सुरुवात झाली आहे. गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली २८ दिवसांचा संघर्ष सुरू झाला असून, १५ डिसेंबर रोजी ही पदयात्रा दिल्ली येथे पोहोचणार आहे. कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीच्या दाखल्यांचा प्रश्न, जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींसह विविध मागण्यांसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे. आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली असून, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने समाजाच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.