आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे, नागपुरातील ब्लाइंड स्कुलमध्ये देखील आज दहावीचा पहिला पेपर पार पडला, पेपरला जाण्यापूर्वी दही साखर भरवत शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावी ही आमची पहिली पायरी असून, आम्हाला आमच्या परिश्रमावर विश्वास आहे, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.