बीडच्या कुर्ला येथील यशवंत विद्यालयामध्ये आज दहावीच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे छतावरती मंडप लावून पेपर सोडवण्यासाठी बसविण्यात आले होते. हा निर्णय आम्ही स्वतः शाळेने घेतला होता, वरिष्ठांना याची विचारणा करण्यात आली नव्हती. मात्र यापुढे आता विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुढील पेपरसाठी बसविण्यात येणार आहे अशी माहिती अभिषेक राऊत या केंद्रप्रमुखांनी दिली आहे.