जळगाव शहरात तब्बल ११३ धोकादायक आणि जीर्ण इमारती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकडून संबंधित जागामालकांना तत्काळ नोटिसा बजावण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.