छत्रपती संभाजीनगर शहरातील या जमिनीवर तब्बल 380 बेकायदा प्लॉट तयार करून त्यांची विक्री सुरू होती. सातारा, बीड बायपास, पडेगाव आणि मिटमिटा परिसरात शहरालगतच्या मोकळ्या जागांवर बेकायदा प्लॉटिंग करून विक्री करण्याचा सपाटा सुरू असल्याचं समोर आलं आहे.