दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत असताना कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांसाठी खास ट्रॅफिक रायडर्स सेवा सुरू करण्यात आली आहे.