छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील श्री सारंग स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीमधून शिवराय साकारण्यात आले. बाराशे विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक सहभाग नोंदवत मैदानावर मानवी साखळी उभी केली.