परळी खोडवा सावरगाव येथील पाझर तलावात फक्त १५ टक्के पाणीसाठा शिल्लक. परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील पाझर तलावात सध्या केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हाच्या झळा सुरू झाल्यामुळे परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तलावातील पाण्यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे.