२५ मोठ्या जातीय दंगली, दोनदा साखळी बॉम्बस्फोटांची झळ सोसणाऱ्या मालेगाव शहराची सुरक्षा व्यवस्था कडक केली जात आहे. वाढती गुन्हेगारी व कायदा सुव्यवस्था नियंत्रणासाठी संवेदनशील ठिकाणांच्या परिसरात कायमस्वरुपी १५० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची उच्च क्षमतेची यंत्रणा कार्यान्वीत झाली आहे. सध्याचे पोलिस बल अपुरे ठरत असताना गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची चोवीस तास निगराणी सुरु झाल्याने गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे.या सीसीटीव्ही ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली.