चाळीसगावच्या टरबुजाला काठमांडूतून मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे. या टरबुजाला 21 रुपये किलो असा दर मिळाला आहे. एकूण 150 टन टरबूज निर्यात करण्यात आला आहे. त्यामुळे चाळीसगावच्या शेतकऱ्याला 31 लाखांहून अधिक उत्पन्न मिळालं आहे.