वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोवर्धन गाव हे आई जगदंबा रेणुका मातेच्या जागृत ठाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार आई जगदंबेने दैत्यांचा संहार केला, त्या विजयाचे जागृत प्रतीकात्मक स्वरूप म्हणून येथे दैत्याच्या सोंगाची परंपरा गेल्या १५० वर्षांपासून अखंडपणे गोवर्धन या गावात जोपासली जात आहे.या परंपरेत आई जगदंबा व दैत्याच्या प्रतिरूपात्मक भूमिकेचे सादरीकरण करण्यात येते, ज्याला स्थानिक भाषेत ‘सोंग’ असे म्हटले जाते. दरवर्षी या निमित्ताने दोन दिवस भव्य मिरवणूक काढण्यात येते.मिरवणुकीच्या पहिल्या दिवशी आई रेणुका मातेचे, तर दुसऱ्या दिवशी आई कालिंका मातेचे सोंग स्वरूपात दर्शन घडते.