राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज राज्यभरातील 17 लाख कर्मचारी संपावर आहेत. या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी देखील सहभागी झाले असून शासकीय कामकाजावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सरकारकडे जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे.