नवी मुबंईत कारमधून बाहेर येऊन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर सानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मोटर कायदा कलमांतर्गत चालक आणि दोन जणांवर गुन्हा दाखल केला.