पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली जवळ भीमा नदीमध्ये एक मोठी 20 फुटाची मगर आढळून आली आहे. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. अशातच पिराची कुरोली बंधारा नजीक एक मोठी मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आसपासच्या शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाच्या माध्यमातून या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे. भीमा नदीमध्ये प्रथमच मगर दिसून आल्याने एकच खळबळ माजली आहे.