1 जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथे 208 वा शौर्यदिन साजरा होत असून या अनुषंगाने विजयस्तंभ परिसरात जय्यत तयारी सुरू आहे, विजयस्तंभ सजावटीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून विजयस्तंभ सजवण्यासाठी एक लाख आर्टीफिशीयल फुले आणि एक टन ओरिजनल फुलांचा वापर करून विजयस्तंभ सजावला जाणार आहे यांची तयारी सध्या सुरू आहे