नंदुरबार शहरात सर्वीकडे गणेशोत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवा निमित्ताने नंदुरबार श्रॉफ विद्यालयात 2,100 विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून "भक्तीचे कमल" ही कलात्मक बैठक रचना साकारत गणरायाला वंदन केले.