गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठानी या 5 नद्यांना पूर आला आहे. चामोर्शीतील चिचडोह धरण 100% पूर्ण भरला आहे. वैनगंगा नदीला पाण्याची पातळीत मोठी वाढ या दोन दिवसात झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी वैनगंगा नदीचा पाणीप्रवाह तसेच नद्यांचा प्रवाह देखील जास्त असल्याने पूरस्थिती कायम आहे. दरम्यान रस्ते बंद असल्यामुळे तेथे अडकलेल्या प्रवाशांना शेल्टर होम मध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.