बीड तालुक्यातील चौसाळा इथले शेतकरी सयाजी शिंदे यांच्या शेतातून 22 टन डाळिंब चोरीला गेले आहेत. याप्रकरणी नेकनूर पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर एका रात्रीत एवढी मोठी चोरी होऊ शकत नाही. 10 ते 12 टनापर्यंतची योग्य तक्रार दिल्यास आम्ही गुन्हा नोंद करून तपास करू, असं सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी स्पष्ट केलं.