शहापूर तालुक्यातील दापूरमाळ येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या शाळेत केवळ २४ विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत. पण या साऱ्यांचा जीव धोक्यात आहे. कारण त्यांचे शिक्षण पडक्या आणि तडे गेलेल्या इमारतीत सुरू आहे.