कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता वन्यजीवांवरही होताना दिसत आहे. कल्याण पूर्वेतील आदिवली-ढोकळी परिसरातील चेतन पार्क सोसायटीमध्ये साडेतीन फुटांची घोरपड आढळून आली. ही घोरपड एका झाडावरून सोसायटीच्या भिंतीवर चढत इमारतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती.