जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथील सचिन दादा रूपनवर याने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे सचिनने सर्व विषयांमध्ये 35 गुण मिळवत 35 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सचिनची उंची अवघी 3.5 फूट असल्याने त्याच्या निकालाची तालुक्यात मोठी चर्चा होत आहे.